Loan Hypothecation On Vehicles: तुम्ही कार लोन घेतलंय? आता RTO ऑफिसला जाण्याची गरज नाही, नवीन अपडेट आली समोर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऑनलाइन लोन हायपोथेकेशन

कर्ज घेतलेल्या वाहन मालकांनसाठी एक मोठी बातमी आहे. वाहनांवरील लोन हायपोथेकेशन म्हणजेच 'कर्ज गहाणखत' भरण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन होणार आहे.

Car loan | yandex

आरटीओ

यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला म्हणजेच आरटीओ प्रत्यक्ष जाण्याची गरज राहणार नाही. महाराष्ट्र परिवहन आयुक्तांनी ही सेवा संपूर्ण राज्यात राबविण्यासाठी अधिकृतपणे एक परिपत्रक जारी केले आहे.

Car loan | google

केंद्र सरकारचे 'फेसलेस' उपक्रम

या नवीन फेसलेस सेवा उपक्रमांतर्गत, वाहन कर्जाची परतफेड झाल्यानंतर, संबंधित बँक केंद्रीय 'वाहन' सिस्टिमद्वारे 'नो ड्यूज' प्रमाणपत्र थेट आरटीओला पाठवेल. यामुळे वेळेची बचत होणार आहे.

Car loan | yandex

पूर्वीची कार्यपद्धत

पूर्वी, वाहन मालकांना कर्ज परतफेड केल्यानंतर त्यांच्या बँकेकडून कर्ज परतफेड प्रमाणपत्र मिळवून अन्य कागदपत्रांसह आरटीओला भेट द्यावी लागत असे. यासह जुने आरसी सर्टिफिकेट परत करणे आणि कर्ज परतफेड दर्शवणारे नवीन आरसी मिळवावी लागत असे.

Car loan | yandex

नवीन कार्यपद्धत कशी असेल?

सर्वप्रथम वाहन मालकाने आरटीओ पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करावा. यानंतर, आधार लिंक्ड मोबाइल नंबरवर पाठवलेल्या ओटीपीद्वारे ओळख पडताळणी केली जाईल.

Car loan | yandex

अर्जदाराची पडताळणी

यानंतर,अर्जदाराचे आधार नाव आरटीओ रेकॉर्डमधील नावाशी जुळते की नाही हे तपासले जाईल. पडताळणीनंतर, सिस्टम कनेक्ट केलेल्या बँकेकडून नो ऑबजेक्शन सर्टिफिकेट म्हणजेच NOC मागवेल.

Car loan | yandex

डिजिटल कागदपत्रे

वाहन मालकाने फॉर्म ३५ आणि इतर आवश्यक कागदपत्रे डिजिटल पद्धतीने अपलोड करावीत. यासाठी आरटीओला कार्यालयात जाण्याची किंवा कोणत्याही हार्ड कॉपी सादर करण्याची आवश्यकता नाही.

Car loan | yandex

४० बॅंका सिस्टिममध्ये जोडले गेले

आतापर्यंत, भारतातील ३५ ते ४० बँका आरटीओच्या वाहन सिस्टिमध्ये जोडल्या गेल्या आहेत. यामुळे बँकांकडून वाहन कर्ज घेतलेल्या कर्जदारांना नवीन फेसलेस सिस्टिमचा फायदा होणार आहे.

Car loan | yandex

NEXT: ब्लू आधार कार्ड म्हणजे काय? कोणासाठी असतं?, अपडेट करण्यास का सांगतंय सरकार?

Aadhaar card | google
येथे क्लिक करा