ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रात्रीच्या वेळी विनाकारण जास्त घाम येणे हे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. ते केवळ उष्णतेशी संबंधित नसून अनेक लपलेल्या आजारांशी देखील संबंधित असू शकते
महिलांमध्ये थायरॉईडमध्ये आणि मेनोपॉज दरम्यान असतुंलित हार्मोनलमुळे रात्री जास्त घाम येतो.
टीबी, एचआयव्ही किंवा बॅक्टेरिल इन्फेक्शनसारख्या आजारांमुळे रात्री जास्त घाम येऊ शकतो.
मधुमेही रुग्णांमध्ये रात्रीच्या वेळी रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक कमी झाल्यामुळे शरीरात जास्त घाम येऊ शकतो.
लिम्फोमासारख्या काही गंभीर आजारांमध्ये, रात्री शरीराला वारंवार घाम येतो.
काही अँटी-डिप्रेसंट, हार्मोनल आणि मधुमेहाच्या औषधांमुळे रात्री जास्त घाम येऊ शकतो.
मानसिक ताण आणि चिंता झोपेदरम्यान मज्जासंस्थेला सक्रिय करतात, यामुळे देखील घाम येतो.