ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात अनेकांना त्वचेशी संबधित समस्या जसे की, अॅलर्जी किंवा इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
पावसाळ्यात काही फॅब्रिकपासून बनलेले कपडे घातल्यामुळे स्कीन इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, पावसाळ्यात निरोगी त्वचेसाठी कोणत्या फॅब्रिकचे कपडे घालवेत, जाणून घ्या.
पावसाळ्यासाठी सर्वात बेस्ट फॅब्रिक म्हणजे कॉटन. कॉटनचे कपडे लवकर घाम शोषून घेते आणि लवकर सुकते यामुळे कपड्यांमध्ये ओलावा राहत नाही.
पावसाळ्यात तुम्ही सिल्क फॅब्रिकचे कपडे देखील घालू शकता. हे खूप आरामदायी असतात.
जॉर्जेट हे पावसाळ्यासाठी सर्वोत्तम फॅब्रिक मानले जातात. हे खूप हलके आणि हवेशीर असतात.
पावसाळ्यात लोकांनी लिनेन फॅब्रिकपासून दूर रहावे. हा फॅब्रिक ओलावा शोषून घेतो ज्यामुळे स्कीन एलर्जी आणि स्कीन इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.