Sakshi Sunil Jadhav
"धुंदीत राहू मस्तीत गाऊ" असा दिवस आहे. एकूणच आनंदाने बहर येणार आहे.
"धरण उशाशी कोरड घशाशी" अशी काही अवस्था होईल. अडचणीच्या काळात आपल्या लोकांनी मदतीला यावं असं वाटत असताना सुद्धा हात पुढे येणार नाहीत.
कुटुंबीयांतील एखाद्या व्यक्तीची आजारपणात आज काळजी घ्यावी लागेल. नव्याने परिचय आणि ओळखी होण्याचा दिवस आहे.
"छबीदार छबी मी तोऱ्यात उभी" असे कार्यक्षेत्र आज तुमचे असेल. प्रशंसा मिळेल. केलेल्या कामाचे ऍप्रिसिएशन झाल्यामुळे उत्साह वाढे.
"देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा" आपल्या राशीला थोडे वेगळेपण असले तरी आज दिवस अध्यात्मात घालवावासा वाटेल. भाग्यकारक घटना घडतील.
"काटा रुते कुणाला" अशी भावना येईल. वेळेला हात द्यायला तर कोणी येत नाही मात्र अडचणी पुढे उभे टाकण्यात आपलेच लोक असतात.
"अरे संसार संसार जसा चुल्हा तव्यावर" व्यवसायिक आणि संसारिक जबाबदाऱ्या आपल्याला आज पेलाव्या लागतील.
झुक झुक गाडी प्रमाणे आयुष्य संथ चालू आहे असे जाणवेल. घ्यावी वाटली भरारी तरी आज अडचणी आणि शत्रूंच्या कारवाया वाढतील.
"भेटी लागे जीवा लागलीसे आस" उपासनेला दिवस खास आहे. खास दत्तगुरूंची विशेष कृपा आपल्यावर राहणार आहे. धनयोग उत्तम आहेत.
ससा आणि कासवाच्या गतीसारखे आपले आयुष्य आहे. धीम्या चालीने जाता. पण विजय मिळवता.
एखाद्या गोष्टीत समरसून, जीव ओतून काम कराल. पराक्रमांची शर्थ कराल. यश खेचून आणाल असा दिवस आहे. स्वतःवर गर्व वाटेल अशा गोष्टी घडतील.
"लक्ष्मी येई घरा" हे वाक्य आज खरे ठरेल. गुंतवणुकीचे व्यवसाय, वारसा हक्काचा पैसा, मेहनतीने कष्टांने मिळालेल्या पैशाची आवक जवळ सुद्धा चांगली राहील.