Sakshi Sunil Jadhav
मनसोक्त जीवन जगण्याचा फंडा आज तुम्हाला सापडेल.चार आपली रास आहे. कुठेतरी प्रवासामधून आज तुम्हाला आनंद मिळेल.
मोठ्या मोठ्या आकांक्षा पैशाशी निगडित असणाऱ्या गोष्टी याचे आयोजन नियोजन आपल्या राशीला आवडते. आज परदेश गमनाशी निगडित काही महत्त्वाच्या बैठका होतील.
सून, जावयांच्या कडून अतिशय चांगली वागणूक तुम्हाला मिळणार आहे. आदराने सन्मान मिळाल्यामुळे दिवसाचा आनंद शिगेला पोहोचेल.
आपली रास जरी साधी असली तरी कष्टाला मागे पुढे पाहत नाही. आपल्या जवळच्या लोकांना बरोबर घेऊन योग्य पद्धतीने कामे करणे आपल्याला सहज जमते.
जे ठरवाल ते घडण्याचा आजचा दिवस आहे. भाग्यामध्ये लिखित आहे ते कोणीही टाळू शकत नाही. आज भाग्यकारक घटना घडण्याचा तुमचा दिवस आहे.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा न करता पुढे जावे लागेल. बौद्धिक गोष्टींमध्ये घोडदौड होईल. अर्थातच शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असा काहीसा आपला दिवस आहे.
व्यवसायामध्ये नव्याने काहीतरी घडणारा आजचा दिवस आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये भरभराट होईल. नव्या नव्या संधी मिळणार आहेत. पार्टनर कडून योग्य ती मदत मिळेल. आणि कामे मार्गी लागतील.
मूत्राशयाची निगडित आजार किंवा काही आजार ज्याचे निदान लागणार नाही अशा गोष्टी मागे लागतील. शत्रूंचा त्रास सुद्धा वाढता राहील.
दत्तगुरूंची विशेष कृपा आपल्यावर आहे. आज या उपासना मार्गातून नव्याने चांगल्या गोष्टी समोर येतील. सुजाण व्यक्तींमध्ये अभ्यासू व्यक्तींना नवा खजानाच सापडेल असा दिवस आहे.
घरातील ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करण्यासाठी आज वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टीशी निगडित व्यवहार होतील. शेतीच्या कामांमध्ये योग्य तो मार्ग सापडेल.
पैशाच्या मागे असणारे आजकाल जग आहे. आपणही अर्थात याला मागे पडत नाही. वेगळ्या काहीतरी गोष्टीतून पराक्रम होईल. केलेल्या कामाची मुक पावती आज मिळेल.
जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. नाहक दवाखाने मागे लागतील.