Sakshi Sunil Jadhav
कोणतीही गोष्ट स्वस्थतेने आपण करत नाही. प्रत्येक गोष्टीचा उतावळेपणा, कामाचा उरक आणि लगेच व्हावी अशी इच्छा असते. आज काही गोष्टी आज, आत्ता, ताबडतोब असा काहीसा दिवस आहे.
आयुष्य जगायचे तर आनंदासाठी असा आपला फंडा आहे. कला, मनोरंजन क्षेत्रामध्ये आज विशेषत्वाने सहभाग घ्याल. लक्ष्मी उपासना फलदायी ठरेल.
अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याची सवय आज सोडणं गरजेचं आहे. महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देऊन कामे करा. बिन महत्वाच्या गोष्टी उद्या केल्या तरी चालतील.
माणसे जोडत जाणे आपल्या जवळच्या लोकांना स्नेह प्रेम देणे ही आपल्या राशीची खासियत आहे. आज संसारिक गोष्टी सहज घडतील. जोडीदाराबरोबर हितगुज साधाल.
ठरवून आलेला दिवस नाही. येणाऱ्या गोष्टींना तोंड देणे हेच आपल्या हातात आहे. पण आपली हार न मानणारी रास आहे. शत्रूंवर सुद्धा मात कराल.
कला क्रीडा क्षेत्रात विशेष प्रगती आहे. एक वेगळा पराक्रम भौतिकदृष्ट्या आज आपल्याकडून होईल. विष्णू उपासना करावी.
कितीही नाही म्हटले तरी आपल्या लोकांबरोबर जगण्यासाठी सुद्धा पैशालाच महत्त्व आहे हे आज जाणवेल. वाहन सौख्य उत्तम आहे.
सगळ्याच बाबतीत आज तुम्ही आघाडीवर राहण्याचे योग आहेत. कोणत्याही परिस्थितीने न डगमगता तोंड देणारी आपली रास आहे. लहान प्रवास होतील.
राशीच्या नावाप्रमाणेच धन योग आहेत. हिशोबी बेहिशोबी दोन्ही कामे आज होतील. अर्थात धनाची पैशाची आवकजावक चांगली असल्यामुळे दिवस सुखद लागल्याची भावना होईल.
जे ठरवाल त्यामध्ये यश मिळेल आणि चिकाटी न सोडता नेटाने कामे कराल. कष्टाला पर्याय नाही हे यात जाणवेल.पण प्रत्येक गोष्टीत आनंद शोधण्याचा प्रयत्न कराल.
अनेक दिवस जे आपण थांबला होतात अशा नको असणाऱ्या गोष्टी आज पुढे उभे राहतील. बंधन योग, विनाकारण खर्च कदाचित हॉस्पिटललायझेशन यामध्ये पैसा खर्च होण्याची दाट शक्यता आहे.
खूप मोठ्या अशा आकांक्षा न घेता सुद्धा आयुष्य छान सुरळीत चाललंय ही भावना होईल. मोठी महत्त्वकांक्षा असणारी आपली रास नाही. जुन्या गुंतवणुकी फळाला येतील.