Sakshi Sunil Jadhav
प्रवास आणि त्या निगडित होणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी आज आपल्याला झेलाव्या लागतील. वाहन चालवताना काळजी घ्या. धनलाभ मात्र चांगल्या प्रकारे होतील.
व्यवसायामध्ये व्यापारामध्ये चांगली घोडदौड होईल. पैशाला खूप महत्त्व आहे हे आपल्या राशीला जास्त जाणवेल. त्या दृष्टीने नवीन संकल्प आणि उपक्रम आज हाती घ्याल.
मामाचे विशेष प्रेम आज लाभेल. मात्र तब्येतीसाठी आपल्याला आज रेड सिग्नल आहे. विनाकारण कटकटी वाढतील. शत्रूंचा त्रास वाढेल मात्र या सगळ्यातून लीलया बाहेरही याल.
आपल्या राशीला जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे संतती आहे. सर्वांवर आपण प्रेम करता. आज संततीकडून खूप सुखद वार्ता येणार आहेत. शिव उपासना करा.
एखादी मोठी कुटुंबीयांची जबाबदारी आज तुम्हाला पेलावी लागेल. शेतीची कामे, जनावरांची क्रय विक्रय यामध्ये दिवस व्यस्त राहील. घरातील राजकारणी व्यक्तीच्या सहकार्याने पुढे जाल.
लेखन क्षेत्रात वेगळी प्रगती होईल. बुद्धी आणि मन एकत्रित रित्या चालण्याचा आजचा दिवस आहे आणि ते कागदावर छान पद्धतीने उतरवाल. अनेक दिवस ज्या प्रकाशनाच्या गोष्टी उंबरठ्यावर असतील तर त्या दारी येतील हे लक्षात ठेवा.
धनयोग चांगले आहेत. अर्थात लक्ष्मी ही चंचलच शोभते. त्यामुळे पैशाची आवक जावक चांगली होईल. मनाप्रमाणे घटना घडणाच्या आजचा दिवस आहे.
खूप ताकद आणि सहनशीलता असणारी आपली रास आहे. पण विनाकारण काही गोष्टी नकारात्मकही आपल्या मनात येतात. आपली मानसिकता स्वस्थ ठेवण्यासाठी विविध प्रयत्न कराल आणि ते मिळवायलाही.
मनोबल कमी राहील.आपलीच व्यक्ती जेव्हा आपला घात करते तेव्हा खूप त्रास होतात. त्यात भरीस भर म्हणजे पैशाला हे अनेक वाटा मिळतील. हाती काही राहिले नाही अशी भावना येईल.
सोयीच्या गोष्टी आज होतील. जवळच्या लोकांच्याकडून अपारस्नेह लाभेल. प्रियजनांबरोबर भोजनाचे योग येतील. जुने परिचय आणि गुंतवणूक दोन्हीमधून आज लाभ मिळणार आहेत.
जेवढे प्रयत्न कराल तितके यश मिळेल असा दिवस आहे. समाजकारण, राजकारणामध्ये आपले सन्मान वाढतील. पत वाढेल.
देव भोळी असणारी आपली रास आहे. मात्र सहज देवदर्शनाचे योग आज येतील. आपल्या जवळच्या व्यक्तीकडून भागोदयकारक घटना घडणार आहेत. धनलाभ सुद्धा चांगले होतील. दिवस उत्तम आहे.