Sakshi Sunil Jadhav
काहीतरी गुढत्व घेऊन आलेला आजचा दिवस आहे. वेगळ्या काहीतरी गोष्टी मनात येतील. वेगळे वाचन, उत्खनन यामध्ये दिवस व्यस्त राहील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
संसारामध्ये गोडी गुलाबी ने राहण्याचा प्रयत्न अशी दोघांच्याकडून कृती राहील. आनंदी दिवस घालवण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे व्यवसायांमध्ये सुद्धा प्रगतीपथावर असला. दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात हे लक्षात घ्या.
जरी आपण ठरवले तरी तशाच गोष्टी होतात असं नाही. आजच्या दिवसामध्ये अडचणी या ठरलेल्या आहेत. पण तुमच्या पद्धतीने त्यावर मात कराल. फुफुसाशी निगडित आजार होतील. तब्येतीची काळजी घ्या.
प्रेमामध्ये जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित होतील. आपलेपण वाटून प्रेम वृद्धिंगत होईल. संततीकडूनही चांगल्या बातम्या कानावर येतील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती आहे. अजून काय हवे. दिवस चांगला आहे.
घर खरेदी, वाहन खरेदी यासाठी दिवस उत्तम आहे. मनातील गोष्टी पूर्ण होण्यासाठी वेगळे पंचांग बघण्याची आज गरज नाही. सगळ्या गोष्टी सहज होतील. "सुख आले दारी" असा दिवस आहे.
आपली मुळात वक्तृत्व उत्तम असणारी रास आहे. समोरच्याला आपलेसे करण्यासाठी एखाद्या छानसे व्यासपीठ लाभेल. जवळचे प्रवास होतील. कामांमध्ये आपल्या लोकांच्याकडून वाहवा होईल.
जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी लागेल. विनाकारण काही गोष्टी डोके वर काढतील. पण कुटुंबीयांच्या साथीमुळे पुढे जाल. पैशाची आवक जावक चांगली आहे.
अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आज तुमच्याकडून सहज होतील. कामाला एक वेगळा हुरूप आणि छटा येईल. सकारात्मकता आणि प्रभाव या दोन्ही गोष्टींमुळे आज तुमचे व्यक्तिमत्व उजळून येईल.
खर्चच खर्च. होऊ दे खर्च. असा काहीसा दिवस आहे. हात आखडता घेऊन चालणारच नाही. पण आपली दोलायमान अवस्था टाळा. विनाकारण कटकटी वाढण्याची शक्यता आहे. तशी मानसिकता भक्कम करा.
जवळचे मित्र मैत्रिणी यांबरोबर आनंदाचे दिवस घालवाल. विविध लाभ होतील. गुंतवणुकी मधून फायदा आहे. दिवस चांगला आहे.
कामाचे वेगळे प्रशस्तीपत्र आज आपल्याला मिळेल. वरिष्ठांच्या कडून शाबासकीची थाप ठरलेली आहे. कामा निमित्त प्रवास होतील. त्यावेळी काही संशोधनात्मक गोष्टीमधून पुढे जाल.
दत्तगुरूंची कृपा आज आपल्यावर राहणार आहे. मानसिकता सात्विक आणि चांगली राहील. एक वेगळ्या प्रकारचे समाधान आज लाभेल. देवदर्शनाचे योग आहेत. नातवंड सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.