Sakshi Sunil Jadhav
आजचा दसरा ठरणार भाग्याचा. नोकरीमध्ये प्रगती बढतीचे योग आहेत. विशेष भरभराटीचे योग आज घडत आहेत.
काही दिवस असे असतात की न मागता आपल्याला देव देतो. दसरा हा सण सुवार्ता कानावर देईल. लक्ष्मी उपासना विशेष फलदायी ठरेल.
विजयादशमी असली तरी आयुष्यात अडचणी येतील. आज आपल्या नशिबात संकटे आहे यातून मार्गक्रमण करत पुढे जाल.
जोडीदाराच्या मागण्या मान्य करून पुढे जावे लागेल. तरच तुमचा दसरा आज हसरा होईल. नव्याने खरेदी होईल.
प्रयत्नांती परमेश्वर असा दिवस आज आहे. मेहनतीने यश पादाक्रांत कराल. कधी कधी आपल्याच लोकांकडून त्रास होतो असेही वाटेल.
जे ठरवाल ते होईलच. विशेषतः सरस्वतीची कृपा आपल्यावर राहणार आहे. सृजनशीलता वाढेल. विष्णू उपासना विशेष फलदायी ठरेल.
कुटुंबियांच्या बरोबर आनंदात दिवस व्यतीत कराल. घरासाठी नव्याने खरेदी होईल. घर खरेदी, वाहन खरेदी गुरे- ढोरे यांबाबत आज भरभराट घेऊन आलेला दिवस आहे.
आपल्या पराक्रमाला यशाचा मुकुट लाभेल. भावंडांचे सौख्य लाभून प्रेमाने दिवस साजरा कराल.
कितीही अधिक उणे असले तरी सुद्धा सणासुदीच्या दिवशी कुटुंबीयांना पर्याय नाही हे आज जाणवेल.
न बोलता गोष्टी कराल .आयोजन नियोजन चांगले राहील. आरोग्य उत्तम राहील. दिवस चांगला आहे.
होऊ द्या खर्च असे काहीसे आज दिसते आहे. जोडीदारासाठी विशेष पैसा खर्च करावा लागेल. मोठ्या प्रवासाचे योग आहेत.
सगे ,सोयरे, सोबती, नातेवाईक, मित्र, मैत्रिणी यांबरोबर आज ऊठबस होईल. मनातील गोष्टींचे हितगुज साधाल.