Sakshi Sunil Jadhav
कामानिमित्त प्रवासाला जाण्याचे योग आहेत. मित्र-मैत्रिणींच्या सहवासाने मन प्रफुल्लीत राहील.
गुरुकृपा लाभून पुढे जाण्याचे योग आहेत. एखादी महत्त्वाची घटना घडेल आणि नवीन जबाबदारी अंगावर येऊन पडेल.
व्यवसायामध्ये अडीअडचणी आल्या तरी सुद्धा नवीन तंत्र आणि मंत्र आज अमलात आणणार आहात.
रखडलेली कामे आज मार्गे लागणार आहेत. एकूणच मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल वाढणाऱ्या घटना घडल्यामुळे मन प्रसन्न आणि आनंदी राहील.
"करायला गेलो एक, झालं एक". अशा काही गोष्टी आज होण्याची शक्यता आहे. आपल्या वस्तू गहाळ होणार नाहीत ना याची सुद्धा दक्षता घ्या.
पैसा हा आपल्या दृष्टीने आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. हिशोबी असणारी आपली रास आहे.
कष्ट आणि मेहनतीला आपली रास कधीही मागे पडत नाही. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कामाचा गौरव होईल. प्रतिष्ठा लाभेल.
काही महत्त्वाच्या गोष्टी आयुष्यात लवकरच चांगल्या घडणार आहेत. ज्याची वाट पाहत आहात अशा आनंद वार्ता आज कानी येतील.
कोणाचेही सहकार्याची आज अपेक्षा करूच नका. "आपण भले आपले काम भले" हाच फंडा आजमवाल तर बरे राहील. खर्चाचे प्रमाणही वाढते राहील.
भागीदारी व्यवसायामध्ये सुयश लाभण्याचा आज दिवस आहे. दैनंदिन कामे सुद्धा मार्गी लागतील.
काहींना आरोग्याच्या तक्रारी आज जाणवतील. नोकरीमध्ये अडचणी आणि संकटे जरी असतील तरी यातून सुखरूप बाहेर पडाल.
संतती सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. क्रीडा क्षेत्रामध्ये, कलाक्षेत्रात प्रगती होईल. दिवस चांगला आहे.