Sakshi Sunil Jadhav
आज वेगळे काहीतरी करण्याच्या मार्गावर असाल. अवघड गोष्टी सोप्या होतील. दिवस सकारात्मक आहे.
विनाकारण खर्च वाढतील. या हाताने घ्यावे आणि हाताने द्यावे असा दिवस आहे. अर्थातच "आला गेला मनोगते".
सून जावयांच्या बरोबर आनंदाचे क्षण व्यक्तित कराल. प्रेमाला नव्याने आकार येईल. धनलाभ चांगले आहेत.
धावपळीचा दिवस आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये विविध वाहनातून प्रवास करण्याचे योग आज आहेत.
रवी उपासना आज उत्तम ठरेल. दानधर्म आणि उदारता वाढती राहील. जिद्दीने पेटून उठाल आणि यश मिळवाल.
आपल्याच स्वभावामुळे काही वेळेला एकटेपण येते. आज अनेक कामे एकट्याचा जीवावर करावे लागतील. अपयशाचे तमा न बाळगता पुढे जा.
कामासाठी भटकंती वाढेल आणि व्यापार उदीम चांगले होतील. व्यावसायिक जोडीदाराबरोबर नव्या संकल्पना रुजवाल.
तब्येतीची आज काळजी घ्यावी लागेल. किडनीशी निगडित आजार होतील. नोकरीमध्ये धावपळीचा दिवस आहे. महत्त्वाचे ऐवज आज सांभाळा.
सद्गुरु कृपा आपल्यावर आज विशेष राहणार आहे. शेअर्स, रेस याच्यामध्ये पैसा मिळेल. संतती पासून सुख मिळेल.
जुन्या गोष्टी नव्याने करण्याचा आज अट्टाहास राहील घरामध्ये काही खरेदी होईल. सर्व सुखाच्या दृष्टीने दिवस आज चांगला आहे.
जवळच्या प्रवासातून फायदा आहे. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. स्वतःवरचा आत्मविश्वास आज वाढेल.
"याचसाठी केला होता अट्टाहास खास "असा दिवस आहे. धनाची चलती अबाधित राहील. कुटुंबीयांच्या सहकार्याने पुढे जाल.