ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या धुळीच्या अॅलर्जीची समस्या आता लोकांमध्ये सतत दिसून येत आहे.
अॅलर्जीमुळे अनेकांना विविध आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.
मात्र तुम्हाला माहिती आहे का धुळीची अॅलर्जीची समस्या कशी ओळखता येईल.
जर आपण धुळीच्या ठिकाणी गेल्यावर सतत शिंका येत असल्यास ते धुळीची अॅलर्जीचे लक्षणं असल्याचे समजते.
धुळीच्या अॅलर्जीची समस्या असल्यास नाकातून पाणी वाहू लागते.
धुळीची अॅलर्जी असलेल्या व्यक्तींना त्यांच्या डोळ्यात सतत वेदना जाणवतात.
अनेकवेळा नाकाच्या आत जळजळ ही होते.
धुळीच्या अॅलर्जी असलेल्या व्यक्तींच्या डोळ्यांभोवती सूज येते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.