Dhanshri Shintre
आपल्या शरीराच्या चांगल्या फिटनेससाठी प्रथिने हे सर्वात महत्वाचे पोषक तत्व आहे.
अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. जर तुम्ही अंडी खात नसाल तर तुम्हाला भाजलेल्या चण्यातून प्रोटीन मिळू शकते.
१०० ग्रॅम कच्च्या भाजलेल्या चण्यांमध्ये सुमारे १९-२० ग्रॅम प्रथिने असतात. शाकाहारी लोकांसाठी हा एक अतिशय फायदेशीर पर्याय आहे.
प्रथिनासोबतच भाजलेल्या चण्यांमध्ये लोह देखील असते, जे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास आणि ॲनिमियापासून बचाव करण्यास मदत करतात.
भाजलेले चणे खाल्ल्याने स्नायू मजबूत होतात. याचे नियमित सेवन केल्याने शारीरिक कमजोरी दूर होते.
भाजलेले चणे फायबरने समृद्ध आहे, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
भाजलेल्या चण्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
भाजलेल्या चण्यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करते आणि हृदय निरोगी ठेवते.
NEXT: किवी फळ खाण्याचे गुणकारी फायदे, जाणून घ्या...