Surabhi Jayashree Jagdish
सुभेदार धबधबा हा भीमाशंकर वन परिसरात, घनदाट जंगलांमध्ये लपलेला आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असा सुंदर धबधबा आहे.
मुळात हा धबधबा फारसा प्रसिद्ध नाही, पण निसर्गप्रेमी आणि अनुभवी ट्रेकर्स यांच्यासाठी हे एक खूपच थ्रिलिंग ठिकाण आहे.
मुंबईहून कर्जतकडे यावं लागेल. कर्जतहून खांडस गावात तुम्हाला पोहोचावं लागेल.
खांडस गावातून सुभेदार धबधब्याच्या ट्रेकसाठी सुरुवात होते. ही वाट जंगलातून जाते आणि ट्रेकिंगचा अनुभव थोडा दमछाक करणारा पण थ्रिलिंग असतो
मुंबई ते कर्जत पासूनचं अंतर सुमारे 60 ते 65 किमी आहे. तर कर्जत ते खांडस गाव यांच्यातील सुमारे 15 ते 20 किमी आहे.
हा धबधबा भीमाशंकर ट्रेक रूटच्या शेवटच्या टप्प्यावर, खोल दरीमध्ये असतो. इथे पाणी प्रचंड वेगात आणि आवाजात कोसळतं, त्यामुळे नजारा थक्क करणारा असतो.
गर्दी तुलनेत कमी असल्यामुळे शांतता आणि निवांतपणा अनुभवता येतो.