ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो, मात्र ते योग्य प्रमाणात आहारात घेतल्यास आरोग्यास फायदेशीर ठरते.
जगातले सर्वात महाग मीठ किती किमतीचं आहे आणि त्यात काय खास आहे, तुम्हाला माहित आहे का?
कोरियन बांबू मीठाचे २५० ग्रॅम सुमारे $१००, म्हणजेच भारतीय रुपयांत जवळपास ८,५०० रुपये किंमत आहे.
त्याची जटिल निर्मिती प्रक्रिया आणि आरोग्यदायी फायदे यामुळे हे मीठ खूप महाग आणि खास मानले जाते.
हे मीठ तयार करताना, समुद्री मीठ बांबूमध्ये भरले जाते आणि नंतर ते प्रचंड तापमानात भाजले जाते.
ही प्रक्रिया जवळपास 9 वेळा केली जाते, ज्यामुळे मिठामध्ये नैसर्गिक खनिजांचे मिश्रण होते, असे मानले जाते.
अँटीऑक्सिडंट्सने भरलेले हे मीठ आरोग्यास लाभदायक असून, अनेक प्रकारच्या आजारांवर उपयुक्त असल्याचे मानले जाते.
अँटिऑक्सिडंट्समुळे त्याचा रंग गडद जांभळ्या रंगाचा असतो, म्हणूनच या मिठाला जांभळा मीठ म्हणतात.