Dhanshri Shintre
रक्ताशिवाय जीवन शक्य नाही, कोणताही माणूस रक्ताशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही.
शरीराच्या कुठल्याही भागाला जखम झाली की तुम्ही पाहिलं असेल, तिथून लगेच रक्त वाहू लागते.
म्हणूनच आपल्याला वाटते की शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात रक्त पोहोचतं आणि सतत वाहत असतं.
पण मानवाच्या शरीरात असा एक अवयव आहे जिथे रक्त अजिबात जात नाही किंवा वाहत नाही.
तुम्हाला माहिती आहे का, शरीराचा असा कोणता भाग आहे जिथून रक्तस्राव कधीच होत नाही?
मानव शरीरातील कॉर्निया हा असा एकमेव अवयव आहे ज्यामध्ये रक्त प्रवाह किंवा रक्तस्त्राव होत नाही.
कॉर्निया हा डोळ्याच्या पुढील भागावर असलेला एक पारदर्शक, घुमटासारखा आणि सुरक्षात्मक थर असतो.
कॉर्नियामध्ये बारीक नसांचे जाळे असते, जे त्याच्या संवेदनशीलतेसाठी आणि कार्यक्षमतेसाठी महत्त्वाचे असते.