IPL 2024: 'या' खेळाडूंना अर्ध्यावरती डाव मोडत सोडावं लागलं कर्णधारपद

Bharat Jadhav

आयीपीएल

फुटबॉल लीगमध्ये हंगामाच्या मध्यात खराब कामगिरीमुळे काही क्लब आपले मुख्य प्रशिक्षक बदलतात, तसेच काही प्रकार आयपीएलमध्येही घडलेत.

ipl | yandex

कर्णधार हटवा

हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली संघाने पहिले २ सामने गमावले. यानंतर त्याला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी होत आहे.

yandex

५ विजेतेपद घेणाऱ्याला डावललं

गेल्या वर्षी लिलावापूर्वीच हार्दिक पांड्याला फ्रँचायझीचा कर्णधार बनवण्यात आले. मुंबईसाठी 5 विजेतेपद पटकावणाऱ्या रोहितच्या जागी हार्दिक कर्णधार बनवण्यात आलं.

२००८ डेक्कन चार्जर्स

आयपीएलच्या पहिल्या हंगामात डेक्कन चार्जर्स (हैदराबाद)चा कर्णधार व्हीव्हीएस लक्ष्मणला दुखापतीमुळे काही सामन्यांनंतर कर्णधारपद सोडावे लागले होतं.

२०१३ मुंबई इंडियन्स

सुरुवातीला मुंबई इंडियन्स कर्णधार ऑस्ट्रेलियन क्रिकेटर रिकी पॉन्टिंग होता. परंतु सामने जिंकू शकत नसल्याने आयपीएलच्या मध्यातच त्याने कर्णधारपद सोडलं होतं.

२०१८ दिल्ली डेअरडेव्हिल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्सचा खेळाडू गौतम गंभीरला धावा करता आल्या नाहीत आणि ना संघाला विजय मिळवून देता आला म्हणून त्याने आयपीएलच्या मध्यात कर्णधारपद सोडले होते.

२०२१- सनरायझर्स हैदराबाद

सनरायझर्सने केवळ डेव्हिड वॉर्नरला हंगामाच्या मध्यातून कर्णधारपदावरून हटवले होते. वॉर्नरच्या जागी केन विल्यमसनकडे नेतृत्त्व देण्यात आलं होतं.

२०१९ - राजस्थान रॉयल्स

२०१९मध्ये राजस्थान रॉयल्सला आयपीएलच्या सुरुवातीपासून पराभव स्वीकारावा लागला होता, त्यामुळे अजिंक्य रहाणेला कर्णधारपदावरून दूर करण्यात आले होते.

२०२० कोलकाता नाइट रायडर्स

२०२०मध्ये दिनेश कार्तिक धावा काढू शकला नसल्याने कोलकात्याच्या व्यवस्थापनाने त्याला हटवलं होतं.

२०२२-चेन्नई सुपर किंग्ज

२०२२ च्या हंगामात रवींद्र जडेजाकडे नेतृत्त्व देण्यात आलं होतं. पण ५ मॅच हरल्यानंतर जडेजाला काढून टाकण्यात आले. त्यानंतर धोनी कर्णधार झाला.

हेही वाचा

येथे क्लिक करा