Manasvi Choudhary
लांब , दाट आणि चमकदार केस असावेत असे प्रत्येक महिलेला वाटते यासाठी महिला अनेक उपाय करतात. पार्लरमध्ये महागडे हेअर ट्रिटमेंट, हेअर स्पा महिला करतात मात्र यासाठी खर्च देखील जास्त होतो.
अशा वेळी स्वयंपाकघरातील सोपा उपाय तुमच्या केसांसाठी फायदेशीर ठरू शकतो. 'तांदळाचे पाणी' केसांसाठी अमृतासारखे काम करते. तुम्हालाही जर घरच्या घरी सोप्या पद्धतीने केस लांब आणि चमकदार करायचे असतील तर तुम्ही हा उपाय करा.
१) तांदळाच्या पाण्याचा वापर लांब आणि चमकदार केसांसाठी केला जातो. तांदळाचे पाणी केसांना लावल्याने केस मऊ होतील तसेच केसांमधील गुंता देखील कमी होण्यास मदत होते.
२) तांदळाच्या पाण्यामध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि अमिनो अॅसिड असतात ज्यामुळे केसांची मुळे घट्ट होतात.
३) तांदळाच्या पाण्याने केस धुतल्याने टाळू स्वच्छ होतो केसांतील कोंडा कमी होण्यास मदत होते, खराब झालेले केस दुरुस्त करतात आणि केस गळणे देखील कमी करतात.
तांदळाचे पाणी बनवण्यासाठी एका भांड्यात तांदूळ स्वच्छ धुवून साधारण अर्धा तास भिजत ठेवा. नंतर हे पाणी गाळून तुम्ही केसांसाठी वापरू शकता.
सर्वातआधी केस साध्या पाण्याने ओले करा. नंतर तांदळाचे पाणी टाळूवर आणि केसांवर हळहळू लावा. साधारण २ ते ३ मिनिटे स्काल्पचा हलक्या हाताने मसाज करा. नंतर केस कोमट पाण्याने धुवा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.