Manasvi Choudhary
आजकाल आपल्यापैकी बरेच लोक शरीराची विशेष काळजी घेतात. अनेकजण सकाळी चहा- कॉफीऐवजी आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या डिटॉक्स ड्रिंकचे सेवन करतात.
जिरा, ओवा आणि मेथीचे पाणी हे घरगुती डिटॉक्स ड्रिंक म्हणून प्रसिद्ध आहेत. आरोग्याच्या अनेक समस्या हे ड्रिंक्स घेतले की दूर होतात. हे तीनही ड्रिंक शरीरावर वेगवेगळे परिणाम करतात म्हणून सकाळी रिकाम्या पोटी नेमके कोणते ड्रिंक प्यावे? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
अनेकजण दिवसाची सुरूवात जिरा, ओवा आणि मेथी याचे पाणी पिऊन करतात. हे पाणी सकाळी रिकाम्यापोटी प्यायल्याने आरोग्यासाठी औषधासमान असते. वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून अनेकजण सकाळी ओवा, जिरा आणि मेथीचे पाणी पितात.
1) जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीराचे मेटॅबॉलिझम वाढते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
2) जिऱ्यातील गुणधर्म शरीराची पचनक्रिया वाढवतात यामुळे पित्त, पोटफुगी, गॅस या समस्या उद्भवत नाही.
3) जिरे रात्रभर पाण्यात भिजत घालून ते पाणी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी प्या.
1) ओव्यामध्ये थायमोल नावाचे घटक असते जे पोटदुखी, पेटके आणि आम्लपित्त यासारख्या आजारांवर आराम देते.
2) तसेच जर तुम्हाला छातीत जळजळ, गॅसचा त्रास होत असेल तर तुम्ही ओव्याचे पाणी पिऊ शकता. मात्र नियमितपणे ओव्याचे पाणी पिणे टाळा.
3) ओवा उष्ण असल्याने गर्भवती महिलांनी ओव्याचे पाणी पिऊ नये.
1) पचनक्रिया आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेथीचे पाणी फायदेशीर
2) मेथीच्या दाण्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते.
3) डायबिटीजच्या रूग्णांसाठी मेथीचे पाणी अधिक गुणकारी आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.