Male Fertility Decline: तुमच्या जेवणामध्ये असलेल्या 'या' एका घटकाने पुरुषांचा कमी होतो स्पर्म काउंट

Surabhi Jayashree Jagdish

कीटकनाशक विपरीत परिणाम

नवीन संशोधनानुसार शेतीमध्ये वापरलं जाणारं सामान्य कीटकनाशक पुरुषांच्या प्रजनन क्षमतेला हानी पोहोचवू शकतात. अभ्यासात दिसून आलंय की, नीओनिकोटिनॉइड नावाच्या कीटकनाशकामुळे नर प्राण्यांच्या स्पर्म काउंटमध्ये घट झाली.

संशोधनात काय निष्पन्न झालं?

अभ्यासांमधून हे स्पष्ट झालं आहे की, शेतीत वापरल्या जाणाऱ्या या कीटकनाशकांमुळे पुरुषांच्या स्पर्मच्या गुणवत्तेत घसरण होतेय.

निष्कर्ष काय?

निष्कर्षानुसार, नीओनिकोटिनॉइड रसायनांच्या संपर्कात आलेल्या नर उंदरांमध्ये स्पर्मची संख्या यावर नकारात्मक परिणाम दिसून आला. त्याचप्रमाणे टेस्टिसच्या ऊतींमध्येही नुकसान आढळलं.

तज्ज्ञांचं मत काय?

या संशोधनाच्या प्रमुख लेखिका सुमैया एस. इरफान यांच्या मते, रसायनांच्या संपर्कामुळे स्पर्मची गुणवत्ता कमी होते, हार्मोन्स असंतुलित होतात आणि टेस्टिक्युलर टिश्यूला हानी पोहोचते.

मानवांसाठीही चिंतेचा विषय

वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, सर्व सस्तन प्राण्यांमध्ये स्पर्म तयार होण्याची प्रक्रिया जवळपास सारखीच असते. त्यामुळे प्राण्यांमध्ये दिसलेला परिणाम मानवांसाठीही चिंतेचा विषय आहे.

धक्कादायक बाब

अमेरिकेत केलेल्या एका सर्वेक्षणात आढळलं की, तीन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जवळपास अर्ध्या लोकांच्या शरीरात नीओनिकोटिनॉइड्सचे रासायनिक अंश आढळले आणि मुलांमध्ये हा स्तर आणखी जास्त होता.

कसं शरीरात पोहोचतं?

हे कीटकनाशक वनस्पतींमध्ये पूर्णपणे शोषले जातात, त्यामुळे फळे किंवा भाज्या धुतल्यानंतरही त्यांचे अंश राहतात.

ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस

संशोधनानुसार, हे रसायन शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवतात, ज्यामुळे स्पर्म सेल्स आणि डीएनएला नुकसान होतं. ज्यामुळे स्पर्म तयार होण्याची प्रक्रियेवर परिणाम होतो.

Skin care: थंडीमध्ये हात काळे होतायत? या सोप्या टीप्सने त्वचा होईल सॉफ्ट आणि उजळ

येथे क्लिक करा