Surabhi Jayashree Jagdish
रामगड किल्ल्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून प्रचलित आहे. जुन्या मराठा राज्यातील संरक्षणात्मक किल्ल्यांपैकी हा एक महत्त्वाचा किल्ला मानला जातो.
रामगड किल्ला हा मराठा साम्राज्याच्या काळात बांधण्यात आला असून त्याचे बांधकाम अत्यंत मजबूत दगडी रचनेत केलंय. हा किल्ला जत शहराच्या मध्यभागी असून संरक्षणासाठी उभारलेला होता.
किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर जुन्या काळातील लष्करी रचना दिसते. याठिकाणची बुरूज आणि तोफा आजही त्या काळातील लढाईची साक्ष देतात.
रामगड किल्ल्याच्या आत राम मंदिर आणि हनुमान मंदिर असल्याने या ठिकाणाला धार्मिक ओळख प्राप्त झाली आहे. अनेक भक्त वर्षभर येथे दर्शनासाठी येतात.
जत शहराजवळच असलेलं भवानी मंदिर, श्री दत्त मंदिर, आणि सिद्धेश्वर तलाव ही ठिकाणं पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. या सर्व ठिकाणांवरून जतच्या सांस्कृतिक वारशाची ओळख मिळते.
रामगड किल्ल्याच्या माथ्यावरून जत शहराचं विहंगम दृश्य दिसतं. सूर्यास्ताच्या वेळी याठिकाणाहून दिसणारा नजारा मोहक असतो.
आज किल्ला थोडा भग्नावस्थेत असला तरी स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांनी त्याचे संवर्धन सुरू केले आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने काही सुविधा उभारण्यात येत आहेत.