Surabhi Jayashree Jagdish
जगभरातील नद्या, समुद्र आणि सागरांमध्ये आजही अनेक गूढ गोष्टी लपलेल्या आहेत. त्यांपैकी काही गोष्टी विज्ञानालाही पूर्णपणे समजलेल्या नाहीत. निसर्गाचे असे अनेक चमत्कार आजही लोकांना आश्चर्यचकित करतात.
आपण सामान्यतः नद्यांचं पाणी निळं किंवा हिरवट असतो. मात्र जगात अशीही एक नदी आहे जी वेगवेगळे रंग धारण करते. हा निसर्गाचा अत्यंत दुर्मिळ आणि सुंदर चमत्कार मानला जातो.
कोलंबियामधील कॅनो क्रिस्टालेस (Caño Cristales) ही नदी जगभर प्रसिद्ध आहे. या नदीला पाच रंगांची नदी असंही म्हटलं जातं. तिचं अप्रतिम सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक याठिकाणी येतात.
ही नदी मुख्यतः जुलै ते नोव्हेंबर दरम्यान विविध रंगांनी चमकू लागते. या काळात नदीमध्ये लाल, पिवळी, हिरवी, निळी आणि काळ्या रंगाची दिसू लागते. त्यामुळे नदी एखाद्या इंद्रधनुष्याप्रमाणे सुंदर दिसते.
नदीत आढळणाऱ्या Macarenia clavigera या विशेष वनस्पतींमुळे रंग तयार होतात. सूर्यकिरणांचा प्रभाव आणि पाण्याची स्वच्छता यामुळे हे रंग अधिक उठून दिसतात.
कॅनो क्रिस्टालेस नदीला स्वर्गातून उतरलेली नदी असंही म्हटलं जातं. जगातील सर्वात अद्भुत नैसर्गिक चमत्कारांपैकी ती एक मानली जाते. तिचं सौंदर्य पाहिल्यानंतर अनेकजण हा अनुभव आयुष्यभर विसरत नाहीत.