Surabhi Jayashree Jagdish
आजकाल अनेकांना चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे युरिक अॅसिडची समस्या भेडसावतेय.
शरीरात युरिक अॅसिड वाढल्याने चालण्यास त्रास होणे, सांधेदुखी आणि सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात.
आज आम्ही तुमच्यासाठी एक घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, ज्याचं सेवन केल्याने तुमच्या शरीरातील वाढत्या युरिक अॅसिडवर नियंत्रण मिळवता येते.
आज आम्ही एका खास चटणीबद्दल सांगाप आहोत जी युरिक अॅसिड शोषून घेण्यास आणि किडनीला फीट करण्यास मदत करते.
ही चटणी तयार करण्यासाठी तुम्हाला धणेपाने, पुदिना, आले, लसूण, लिंबाचा रस, काळी मिरी, जिरे, काळे मीठ आणि पाणी लागेल.
ही चटणी बनवण्यासाठी, सर्वप्रथम एका भांड्यात पुदिना आणि धणेपाने स्वच्छ करा आणि देठापासून काढून टाका.
आता लिंबाचा रस, काळी मिरी, काळी मीठ, हिरवी मिरची आणि भाजलेले जिरे सोललेले आले आणि लसूण मिसळा. नंतर या सर्व गोष्टी मिक्सर जारमध्ये घाला, पाणी घाला आणि बारीक करा.
आता दररोज जेवणासोबत एक चमचा ही चटणी खा. यामुळे युरिक अॅसिड नियंत्रित होण्यास मदत होईल.