Surabhi Jayashree Jagdish
आज आम्ही तुम्हाला त्या चटणीबद्दल सांगणार आहोत, ज्याचे सेवन केल्याने केवळ मधुमेहच नाही तर कोलेस्ट्रॉल आणि हाय यूरिक ॲसिडही नियंत्रित राहणार आहे.
या चटणीसाठी तुम्हाला ताजं खोबरं, हिरवी मिरची, लसूण आणि आलं हे पदार्थ राहणार आहेत.
सर्वकाही एकत्र घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक करा आणि नंतर त्यात लिंबाचा रस आणि काळे मीठ घाला.
उच्च फायबर आणि अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरलेली ही चटणी साखर आणि कोलेस्ट्रॉल तसंच युरिक ॲसिड कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
2006 च्या अभ्यासात असं आढळून आलं की, कच्च्या लसूणमध्ये रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते.
आलं रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि इन्सुलिनचे उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करते.
नारळाच्या दुधात मिडीयम चेन ट्रायग्लिसराइड्स असतात, जे इंसुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करतात.