ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हे मंदिर आसाममध्ये असून या मंदिरात योनी सारख्या अद्वितीय आकाराला पूजलं जातं या अनोख्या पद्धतीमुळे हे मंदिर प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की येथील देवीला तीन दिवस रक्तस्त्राव होतो.
हे मंदिर ओडिशामध्ये असून या मंदिरावरील ध्वज कधीही वाऱ्याच्या दिशेने फडकत नाही. या मंदिरात भगवान श्रीकृष्णाचे हृदय असे मानले जाते.
हे मंदिर तामिळनाडूमध्ये असून त्याच्या भव्य बुरुजासाठी प्रसिद्ध आहे. एक हजार वर्षांपूर्वी आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय एवढी प्रचंड रचना कशी बांधली गेली हे खरंच एक रहस्य आहे.
हे मंदिर केरळमध्ये आहे. या मंदिरात अफाट संपत्ती असलेल्या गुप्त तिजोरीच्या शोधामुळे या मंदिराने आंतरराष्ट्रीय लक्ष वेधले आहे
उत्तराखंडमधील हो मंदिर चार धामांपैकी एक आहे. शतकानुशतके पूर आणि हिमस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून वाचलेल्या या मंदिराचे गूढ कायम आहे.
हिमाचलमधील हे मंदिर ज्वालामुखी देवीला समर्पित आहे. इथे कोणत्याही इंधनाच्या स्त्रोताशिवाय जमिनीतून सतत ज्वाला निघत असतात
आंध्र प्रदेशमध्ये असलेलं हे मंदिर जमिनीला स्पर्श न करणाऱ्या लटकलेल्या खांबासाठी प्रसिद्ध आहे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.