Manasvi Choudhary
सकाळी उठल्यानंतर रक्तातील साखर अचानक वाढलेली दिसणे ही मधुमेहाच्या लक्षणे मानली जातात. सकाळी अचानक शुगर वाढणे याला फास्टिंग ब्लड शुगर असे म्हणतात.
जेव्हा शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाही तेव्हा साखर पेशीत जाण्याऐवजी रक्तातच राहिल्याने शुगर लेव्हल वाढते.
नकळतपणे रात्री किंवा सकाळी करत असलेल्या काही छोट्या चुकांमुळे शरीरातील इन्सुलिनचे संतुलन बिघडते आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. सकाळी रक्तातील साखर अचानक का वाढते यामागील काही कारणे समजून घ्या.
अनेकांना सकाळी उठल्या उठल्या अंथरुणातच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. रिकाम्या पोटी कॅफिन आणि साखरेचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढते.
रात्रीच्या जेवणात भात, बटाटा, मैदा किंवा गोड पदार्थांचे प्रमाण जास्त असल्यास, रात्री रक्तातील साखर वाढू शकते.
रात्रीच्या अपुऱ्या झोपेमुळे सकाळी शुगर वाढते. अपुऱ्या झोपेमुळे मानसिक आणि शारीरिक ताण येतो. परिणामी, शरीरात 'कॉर्टिसोल' सारखे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, जे इन्सुलिनच्या कार्यात अडथळा आणतात
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.