Thirst at Night: रात्री अचानक झोपेत खूप तहान लागते? शरीर देतंय 'हे' ६ संकेत, वेळीच व्हा सावध

Shruti Vilas Kadam

दिवसभर कमी पाणी पिणे

दिवसभर शरीराला आवश्यक तेवढे पाणी न मिळाल्यास रात्री तीव्र तहान लागू शकते. उकाडा, जास्त घाम येणे किंवा दिवसभर शारीरिक मेहनत केल्यामुळे शरीराला अधिक द्रवपदार्थांची गरज भासू शकते.

Excessive Thirst | pinterest

रात्री जास्त खारट पदार्थ खाणे

रात्रीच्या जेवणात चिप्स, नमकीन, लोणचं किंवा पॅकेज्ड स्नॅक्ससारखे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास तहान वाढू शकते. यातील सोडियममुळे शरीराला अधिक पाण्याची गरज भासते.

Sweet Potato Chips

झोपताना तोंडाने श्वास घेणे

नाक बंद होणे, अॅलर्जी, घोरणे किंवा झोपताना तोंडाने श्वास घेण्याची सवय असल्यास तोंड आणि घसा कोरडा पडतो. त्यामुळे रात्री अचानक पाणी प्यावेसे वाटू शकते.

Night snoring | pinterest

रक्तातील साखर वाढलेली असणे

सतत जास्त तहान लागणे हे मधुमेहाशी संबंधित लक्षण असू शकते. तहानेसोबत वारंवार लघवी होणे, थकवा, धूसर दिसणे किंवा कारण नसताना वजन कमी होणे अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

Blood Suger | GOOGLE

काही औषधांचा परिणाम

काही औषधांमुळे तोंड कोरडे पडू शकते किंवा शरीरातून द्रवपदार्थ अधिक प्रमाणात बाहेर जाऊ शकतात. त्यामुळे तहान वाढण्याची शक्यता असते. नवीन औषध सुरू केल्यानंतर अशी समस्या जाणवत असल्यास ते स्वतःहून बंद न करता डॉक्टरांशी चर्चा करावी.

Take medicines | pinterest

रात्री चहा-कॉफी किंवा मद्यपान

संध्याकाळनंतर मोठ्या प्रमाणात चहा, कॉफी किंवा मद्यपान केल्यामुळे काही लोकांमध्ये तोंड कोरडे पडणे किंवा लघवीचे प्रमाण वाढणे यामुळे रात्री तहान लागू शकते.

Tea

80s Retro Trend: मराठी कलाकारांना 80s रेट्रो ट्रेंडची भुरळ; सोनाली ते रितेश-जेनेलियाचे पाहा भन्नाट लूक

80s Retro Trend
येथे क्लिक करा