ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दरवर्षी लाखो लोक परदेशात फिरण्यासाठी जातात. अशावेळी अनेकांचे पासपोर्ट चोरीला जातात.
आज, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की परदेशात पासपोर्ट चोरीला गेल्यास काय करावे, जाणून घ्या.
पासपोर्ट चोरीला गेल्यास सर्वप्रथम जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा.
तुम्ही ज्या देशात आहात त्या देशातील भारतीय दूतावासाला पासपोर्ट चोरी झाल्याची माहिती द्यावी लागेल. यानंतर पासपोर्ट शोधण्यासाठी तुमची मदत करु शकतात.
पासपोर्ट चोरीला गेल्यावर किंवा हरवल्यानंतर तुम्हाला पासपोर्ट विभागात जावे लागेल. यानंतर तुम्हाला इमरजेंन्सी सर्टिफिकेट मिळेल.
नवीन पासपोर्ट किंवा एमरजेन्सी सर्टिफिकेटसाठी तुम्हाला पोलिसात तक्रार केलेल्याची कॉपी, वीजा कॉपी दाखवावी लागेल.
या सर्व गोष्टींसाठी कमीतकमी एक आठवड्याचा वेळ लागू शकतो.