ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मधमाश्या तुम्हाला कोणतेही त्रास देण्यासाठी चावत नाहीत, तर स्वतःचे रक्षण करण्यासाठी चावतात. मधमाशी चावल्याने तीव्र वेदना आणि सूज येते.
जर तुम्हाला मधमाशीने चावले तर या घरगुती उपायांनी तुम्हाला आराम मिळू शकतो.
मधमाशीने चावले तर बर्फ लावा, यामुळे तात्काळ आराम मिळतो. तसेच, त्यामुळे होणारे नुकसान टाळता येते.
मधमाशी चावल्यास तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल.
कोरफडीचे जेल मधमाशीच्या चावण्यापासून आराम देतो. कोरफडीचा जेल लावल्याने सूज आणि वेदना कमी होण्यास मदत करते.
तुम्ही मधमाशी चावलेल्या ठिकाणी टूथपेस्ट देखील लावू शकता. त्यामुळे विषाचा परिणाम देखील कमी होतो.
मधमाशी चावलेल्या जागी मध राम लावा. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म चाव्यामुळे होणाऱ्या वेदना आणि सूज कमी करतात.