Thigh Size Health Risk: मांड्या जाड की बारीक? मांडीचा आकार सांगणार तुम्ही किती वर्षे जगाल?

Surabhi Jayashree Jagdish

मांड्यांचा आकार आणि मृत्यूचा धोका

डेन्मार्कमधील या अभ्यासात 1,436 पुरुष आणि 1,380 महिलांचा समावेश करण्यात आला होता. सहभागी व्यक्तींच्या मांड्यांचा घेर मोजून त्यांच्या आरोग्याचा पुढील काळात अभ्यास करण्यात आला. सुमारे 12.5 वर्षांच्या फॉलो-अपमध्ये कमी मांड्यांचा घेर असलेल्या व्यक्तींमध्ये एकूण मृत्यूचा धोका अधिक असल्याचं दिसून आलं.

Thigh Circumference Study | saam tv

मांड्याचा घेर

अभ्यासात मांड्यांचा घेर सुमारे 60 सेंटीमीटरपेक्षा कमी असताना अकाली मृत्यूचा धोका वाढल्याचं दिसून आले. संशोधकांनी हा संबंध पुढील अभ्यासातून अधिक तपासण्याची गरज असल्याचंही नमूद केलंय.

Thigh Size and Mortality | saam tv

स्नायूंचं महत्त्व

मांड्यांचा घेर कमी असण्यामागे शरीरातील स्नायूंचं प्रमाण कमी असणं हे एक संभाव्य कारण असू शकतं, असं संशोधकांनी सुचवलंय. मांड्यांमध्ये मोठ्या स्नायूंचे गट असल्याने त्यांची ताकद आणि शरीराची हालचाल यांचा एकमेकांशी संबंध असतो. त्यामुळे केवळ मांड्या जाड असणं आरोग्यदायी असल्याचा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही.

Smaller Thighs | saam tv

हृदयाच्या आरोग्याशीही संबंध

या अभ्यासात कमी मांड्यांचा घेर आणि हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका यांच्यातही संबंध आढळला. पुरुषांमध्ये हार्ट अटॅकशी संबंधित काही परिणाम अधिक स्पष्ट दिसले तर महिलांमध्ये एकूण मृत्यूशी संबंध दिसून आला.

Heart Health | saam tv

मोठ्या मांड्या म्हणजे जास्त आयुष्य असा अर्थ नाही

अभ्यासात सुमारे 60 सेंटीमीटरच्या पुढे मांड्यांचा घेर वाढल्याने अतिरिक्त लाभ स्पष्टपणे दिसला नाही. त्यामुळे ‘मांड्या जितक्या मोठ्या तितके आयुष्य जास्त’ असा निष्कर्ष काढणं चुकीचे ठरेल.

Cardiovascular Health | saam tv

मांड्याचे स्नायू मजबूत कसे कराल?

मांड्यांचे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी स्क्वॅट्स, लंजेस आणि स्टेप-अप्ससारखे स्ट्रेंथ ट्रेनिंगचे व्यायाम उपयोगी ठरू शकतात. नियमित चालणं, सायकलिंग किंवा जिने चढणं यांसारख्या शारीरिक हालचालींचाही व्यायामाच्या दिनक्रमात समावेश करता येतो.

Thigh Measurement | saam tv

मांड्यांचा घेर हा फक्त एक संकेत आहे

मांड्यांचा घेर हा आरोग्य तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक मोजमापांपैकी एक असू शकतो. रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल, वजन, शारीरिक हालचाल, आहार आणि धूम्रपानासारखे अनेक घटक आरोग्यावर परिणाम करतात.

Thigh Circumference and Mortality | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Thigh Size and Heart Disease | saam tv

Castor oil belly button: रात्री झोपताना नाभीमध्ये लावा एरंडेल तेल; हे 7 चमत्कारिक फायदे मिळतील

Castor oil home remedies | saam tv
येथे क्लिक करा