Surabhi Jayashree Jagdish
कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधण्याचा योग आहे. पैशाची अवस्था चांगली राहण्यामुळे मनस्वास्थ्य सुदृढ असेल.
व्यवसायासाठी आपली रास अर्थत त्वाची असल्यामुळे कायमच प्राधान्य देते. आज नवीन मंत्र तंत्र कामाच्या ठिकाणी अवलंबू शकाल.
काही कारण नसताना दिरंगाई होण्याची आज शक्यता आहे. अर्थातच महत्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.
आज अशाच लोकांचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी सुद्धा पार पडणार आहे. दिवस लाभदायक आहे.
पुढाकार घेऊन कामे करायला आपल्याला आवडते. आज तुम्ही घेतलेल्या निर्णय आणि अंदाज अचूक ठरणार आहेत.
आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान यांनी भरलेला आजचा दिवस असेल.
दैनंदिन कामामध्ये व्यत्यय येण्याचा दाट संभव आहे. सावधपणे कामे करावी लागतील. कोणाच्याही मोहाला बळी पडू नका.
कामाच्या ठिकाणी अनेक संधी मिळतील. प्रसिद्धी लाभेल. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल.
आरोग्याच्या तक्रारी राहतील. खर्चाचे प्रमाणही वाढेल. काही निर्णय चुकीचे ठरतील.
शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रगतीचे योग आहेत. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. कामानिमित्त प्रवास होतील. नवे वाहन घेण्याच्या विचारात असाल तर आज त्या गोष्टी मार्गी लागतील.
दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. धर्म, अध्यात्मात प्रगती होईल.