Surabhi Jayashree Jagdish
जोडीदाराचे म्हणणे काय आहे हे ऐकून पुढे जावे लागेल. पैशाशी निगडित चांगले व्यवहार आज घडून येतील.
तब्येतीच्या तक्रारी त्रासदायक ठरतील. कदाचित आरोग्यासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.
विष्णू उपासना आज फलदायी ठरणार आहे. शेअर्समध्ये गुंतवणूक करायला दिवस चांगला आहे.
जागेशी निगडित व्यवहार आज पार पडतील. मनासारख्या घटना घेऊन आलेला दिवस आहे. अनेक वाहनांचे सुख आज लाभेल.
व्यवसायामध्ये वृद्धी आणि भागाकारक घटना घडणार आहेत. आपलाच आपल्यावरच आत्मविश्वास आज दृढ होईल.
जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये आज व्यस्त राहाल.
मनस्वी जीवन जगण्याचा आज प्रयत्न कराल. आरोग्य उत्तम राहणार आहे. दिवस चांगला आहे.
मोठ्या प्रवासाचे नियोजन आणि बैठक सुद्धा आज घडण्याचा दिवस आहे. महत्त्वाचे ऐवज सांभाळा.
प्रापंचिक गोष्टीतून थोडे बाहेर पडून समाजामध्ये दाखवण्याचा आजचा दिवस आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा सुद्धा होईल.
प्रवासाचे आज योग येणार आहेत. कामानिमित्त बाहेर जाल आणि पुढील अनेक कामे वाढतील. सिद्धी, प्रसिद्धी मिळेल.
चांगल्या गोष्टी आणि घटना घडतील. त्यासाठी आपले केलेल्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. शिव उपासना करावी.
अचानक मोठे काही घबाड लागले असा दिवस आहे. नव्याने काही गोष्टी आज घडण्यासाठी विशेष मेहनत घ्याल.