Lung inflammation symptoms: फुफ्फुसांना सूज आल्यावर शरीरात ही लक्षणं दिसून येतात

Surabhi Jayashree Jagdish

फुफ्फुसांना सूज येणं

फुफ्फुसांमध्ये सूज ही बॅक्टेरिया, व्हायरस किंवा फंगसच्या इन्फेक्शनमुळे होते. ही समस्या गंभीर ठरू शकते आणि वेळेवर उपचार गरजेचे असतात. म्हणून लक्षणं ओळखणं महत्त्वाचं आहे.

श्वास घेण्यात अडचण

सूज आल्यास श्वास घेण्यात अडचण निर्माण होते. चालताना, जिने चढताना किंवा बोलताना श्वास वाढतो. आराम केल्यावरही ही समस्या कमी होत नाही.

सततचा खोकला

अनेक दिवस सतत खोकला येत असल्यास हे सूज आल्याचं लक्षण असू शकतं. फार अगोदरी आलेली सूज किंवा संसर्गामुळे खोकला वाढतो.

छातीत वेदना

छातीत वेदना जाणवणं हे महत्त्वाचं लक्षण आहे. दीर्ध श्वास घेताना किंवा खोकताना तीव्र वेदना होतात. हे फुफ्फुसांना सूज आल्याचं लक्षणं आहे.

श्वास घेताना घरघर

श्वास घेताना घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येतो. ही लक्षणं फुफ्फुसांमध्ये सूज असल्याचं दर्शवतात. श्वसनमार्गावर परिणाम झाल्याचं हे लक्षण आहे.

थकणं

फुफ्फुसांना सूज आल्यावर ताप, अंगदुखी आणि अशक्तपणा जाणवतो. त्याचप्रमाणे शरीर थकलेलं वाटू लागतं. ही लक्षणे संसर्गामुळे वाढतात.

त्वचेचा रंग बदलणं

शरीरात ऑक्सिजन कमी झाल्याने त्वचेचा रंग बदलतो. निळसर किंवा फिकट रंग दिसू लागतो. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान पुढं कुठे पळून गेला?

येथे क्लिक करा