High Cholesterol Risk: तुमच्या दररोजच्या या ६ सवयी शांतपणे रक्तवाहिन्यांमध्ये जमा करतायत चरबी

Surabhi Jayashree Jagdish

कोलेस्ट्रॉल

हाय कोलेस्ट्रॉल ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाही. मात्र, रोजच्या काही चुकीच्या सवयींमुळे रक्तवाहिन्यांमध्ये हळूहळू चरबी साचू लागते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. या चुका कोणत्या आहेत ते पाहूयात.

cholesterol control | saam tv

नाश्ता टाळणं

अनेक लोक सकाळचा नाश्ता टाळतात किंवा दिवसातील जेवणाच्या वेळा सतत बदलतात. त्यामुळे चयापचय प्रक्रियेवर परिणाम होतो आणि नंतर जास्त प्रमाणात खाण्याची सवय लागते. यामुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) वाढण्याचा धोका निर्माण होतो.

healthy lifestyle habits | saam tv

पॅकेज्ड पदार्थ जास्त खाणे

चिप्स, बिस्किटं, वेफर्स, केक यांसारख्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. हे पदार्थ वाईट कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल कमी करतात. अशा अन्नाचे नियमित सेवन केल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक तयार होण्याचा धोका वाढतो.

skip breakfast effects | saam tv

जास्त साखर-कॅलरीजचं सेवन

थंड पेयं, मिठाई, पॅकेज्ड ज्यूस आणि साखरयुक्त स्नॅक्स यांमधून शरीरात अतिरिक्त साखर जाते. जास्त साखरेमुळे वजन वाढू शकतं. या बदलांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी बिघडते आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

processed food risks | saam tv

दिवसभर बसून राहणं

दीर्घकाळ खुर्चीवर बसून काम करणं किंवा शारीरिक हालचाल कमी असणं हृदयासाठी हानिकारक ठरू शकतं. शारीरिक हालचालींच्या अभावामुळे शरीरातील फॅट्सचं मॅनेजमेंट योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

sugar intake effects | saam tv

अपुरी झोप घेणं

रोज पुरेशी झोप न घेतल्यास शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडू शकतं. याचा परिणाम कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर होऊन वाईट कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. दीर्घकाळ झोपेची कमतरता राहिल्यास हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

weight gain causes | saam tv

सतत तणावाखाली राहणं

मानसिक तणावामुळे शरीरात काही हार्मोन्सचे प्रमाण वाढतं, ज्याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. तणावात असताना अनेक लोक जंक फूड किंवा गोड पदार्थ जास्त प्रमाणात खातात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याबरोबरच रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचण्याची शक्यता अधिक वाढते.

metabolic health | saam tv

Chhatrapati Shivaji Maharaj history: अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्यासोबत काय केलं?

Shivaji Maharaj history | saam tv
येथे क्लिक करा