Electric geyser explosion: इलेक्ट्रिक गिझर फुटण्यापूर्वी हे संकेत मिळतात

Surabhi Jayashree Jagdish

गिझर

थंडीत गिझरचा वापर सर्वसाधारणपणे वाढतो आणि लोक गरम पाण्याचा उपयोग करतात. गरम पाणी आंघोळीसाठी तसंच इतर कामांसाठी सोयीचं ठरतं. त्यामुळे हिवाळ्यात गिझर हा वापरला जातो.

धोकादायक

गिझर काळजीपूर्वक न वापरल्यास तो धोकादायक ठरू शकतो. चुकीच्या वापरामुळे तो फुटण्याची शक्यता वाढते. म्हणून गिझर वापरताना सुरक्षिततेची काळजी घेणं आवश्यक आहे.

संकेत

गिझर फुटण्यापूर्वी तो कोणते संकेत देतो हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हे संकेत ओळखल्यास मोठा धोका टाळता येतो.

सर्व्हिस न करणं

साधारणपणे गिझर फुटण्याचं कारण म्हणजे योग्य वेळी सर्व्हिस न करणं. दीर्घकाळ सर्व्हिस न झाल्यास त्याचे भाग खराब होतात. त्यामुळे गिझरची कार्यक्षमता कमी होते.

पाणी गळू लागणं

अचानक गिझरमधून पाणी गळू लागणं हा स्पष्ट संकेत असतो. पाणी गळतीमुळे मशीनवर ताण येतो.

पाणी जास्त गरम होणं

गिझरमधील पाणी जास्त गरम होणं किंवा तपकिरी रंगाचं पाणी येणं हेही खराबीचं लक्षण आहे. अशा वेळी गीजरचा वापर टाळावा.

बंद करायला विसरणं

अनेकदा लोक गीजर बराच वेळ ऑन ठेवतात आणि बंद करायला विसरतात. यामुळे त्यातील सेन्सर खराब होतो. सेन्सर खराब झाल्यास गीजरचं तापमान नियंत्रण बिघडतं.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान पुढं कुठे पळून गेला?

येथे क्लिक करा