ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पपई हे औषधी गुणधर्माने परिपूर्ण फळ आहे. पपईचा दररोजच्या आहारात समावेश केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
काही लोकांसाठी पपई खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं. चुकूनही या लोकांनी पपईचे सेवन करु नये.
पपईमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतं. यासाठी पपई कमी प्रमाणात खा.
पपईतील ऑक्सिलिक अॅसिडमुळे किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो. ज्या लोकांना किडनीचा त्रास आहे. त्यांनी पपई खाऊ नये.
गर्भवती महिलांनी कच्ची किंवा अर्धवट पिकलेली पपई खाऊ नये. हे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं.
काही लोकांना पपईचे सेवन केल्याने स्कीन एलर्जी होऊ शकते. जर कोणताही स्कीन एलर्जी असेल तर पपई खाणं टाळा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.