White Hair: केस पांढरे झालेत? घरीच बनवा 'हे' नॅचरल तेल, केस मुळापासून काळे होतील

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पांढरे केस

वाढत्या वयानुसार केस पांढरे होणे सामान्य आहे. परंतु कमी वयातच केस पांढरे होण्यामागे अनेक कारणे असू शकतात.

Grey hair | freepik

कारणे

केस पांढरे होण्यामागे अनेक कारणे असू शकतात जसे की जास्त ताण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अनहेल्दी लाइफस्टाइल. परंतु या घरगुती तेलाचा वापर करुन तुमची केस मुळापासून काळे होतील.

Grey hair | freepik

तेल बनवण्यासाठी लागणारे साहित्य

२ चमचा चहा पावडर, १ वाटी मोहरीचे तेल, २ चमचे भृंगराज पावडर, २ चमचा आवळा पावडर, आणि निएगला सॅटिवा म्हणजेच कलौंजी किंवा काळे जिरे पावडर

Grey hair | freepik

लोखंडी कढई

तेल बनवण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करा. कढई गरम झाल्यावर यामध्ये चहा पावडर घाला आणि मंद आचेवर भाजा. नंतर यामध्ये मोहरीचे तेल घाला आणि चांगले मिक्स करा.

Grey hair | freepik

तेल बनवा

आता या तेलात भृंगराज पावडर, आवळा पावडर आणि कलौंजी म्हणजेच काळे जिरे पावडर घाला. आणि चांगले शिजवा. तेल थंड झाल्यावर ते गाळून एका भांड्यात ठेवा.

Grey hair | freepik

केसांना तेल लावा

रात्री झोपण्यापूर्वी हे तेल केसांना लावून मसाज करा. दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हे तेल वापरा.

Grey hair | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: लहाणपणीचे मित्र ते थेट लग्न, अजिंक्य-राधिकाची फेरीटेल लव्ह स्टोरी तुम्हाला माहीत आहे का?

Ajinkya Rahane | instagram
येथे क्लिक करा