ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अंडी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात.
अंडीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, आयोडीन, फॉस्फरस आणि झिंक असे अनेक पोषक तत्व आढळतात.
पण अंडी खाणे काही लोकांसाठी हानिकारक असू शकते. कोणत्या लोकांनी हे टाळावे हे जाणून घ्या.
ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी अंडी खाऊ नयेत. कारण अंड्याचे पचन होण्यासाठी वेळ लागतो.
कोलेस्ट्रोलच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांनीही अंडी खाऊ नयेत. विशेषतः अंड्याचा पिवळा भाग अजिबात खाऊ नये.
हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या लोकांनी अंडी खाणे टाळावे कारण त्यामुळे रक्ताभिसरणात अडथळा येऊ शकतो.
अंडी शरीरासाठी गरम असते म्हणून अतिसाराचा त्रास असलेल्या लोकांनी ते खाऊ नये.