ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल सर्व काही ऑनलाईन उपलब्ध आहे. कपडे, मोबाईल, किराणा सामान, अगदी फर्निचर देखील. पण हे खरेदी करणे जितके सोपे झाले आहे तितकेच ऑनलाइन घोटाळ्यांचा धोका वाढला आहे.
जर तुम्ही निष्काळजी असाल तर बनावट वेबसाइट किंवा फसव्या डील तुमची फसवणूक करु शकतात. म्हणून ऑनलाईन खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा
फक्त अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंतरा, आणि अजियो सारख्या वेबसाइटवरुनच खरेदी करा. अज्ञात किंवा नवीन लिंक्सवर क्लिक करु नका.
तुम्ही ज्या वेबसाइटवरून खरेदी करत आहात त्याची लिंक 'https://' ने सुरु झाली पाहिजे. हे दर्शवते की साइट सुरक्षित आहे.
जर तुम्ही पहिल्यांदाच वेबसाइटवरुन काहीतरी खरेदी करत असाल तर कॅश ऑन डिलिव्हरी (COD) पर्याय निवडा.
जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरुन "तुम्ही बक्षीस जिंकले आहे" असा कॉल किंवा मेसेज आला तर अजिबात प्रतिसाद देऊ नका. हा स्कॅम असू शकतो.
कोणतेही प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी, त्याचे युजर रिव्ह्यू आणि रेटिंग तपासा. यावरुन प्रोडक्टची क्वालिटी लक्षात येते.