ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पपई हे औषधी गुणधर्माने परिपूर्ण पळ आहे. पपई खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
पपईमध्ये व्हिटॅमिन सी, ए, के, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फोलिक अॅसिड सारखे पोषक तत्व असतात.
अनेकांना पपईचा ज्यूस प्यायला आवडतं. परंतु तुम्हाला माहित आहे का की काही लोकांसाठी पपईचा ज्यूस पिणं घातक ठरु शकतं.
ज्या लोकांना अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या असते. त्यांनी पपईचा ज्यूस पिऊ नये.
पपईमध्ये ऑक्सिलिक अॅसिड असते ज्यामुळे किडनीच्या स्टोनची समस्या होऊ शकते.
जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे औषध घेत असाल तर पपईचा ज्यूस पिणे टाळा.
जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची एलर्जी असेल तर पपईच्या ज्यूसचे सेवन करणे टाळा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.