ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ताक हे एक प्रोबायोटिक पेय आहे. उन्हाळ्यात ताक प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो.
ताकामध्ये प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी १२, पोटॅशियम आणि हेल्दी बॅक्टेरिया असतात. यामुळे हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.
पण काही लोकांनी ताक पिणे टाळावे. कारण याचा त्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो.
ताक आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे अतिसार आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
जर एखाद्याला दमा आणि सर्दी यांचा त्रास असेल तर ताक पिऊ नये. यामुळे समस्या वाढू शकते.
याशिवाय, ज्या लोकांना दुधाची ऍलर्जी, अॅसिडिटी किंवा किडनीच्या समस्या आहेत त्यांनी देखील हे पिणे टाळावे.
प्रत्येकाने मर्यादित प्रमाणात ताक प्यावे. जास्त प्रमाणात ताक पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.