ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात, तीव्र उन्हामुळे शरीर डिहायड्रेट होते. बहुतेक लोकांना उन्हाळ्यात बाहेरून आल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते.
उन्हाळ्यात बाहेरून आल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने मृत्यू होऊ शकतो का जाणून घेऊयात.
उन्हाळ्यात बाहेरून आल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात आणि मृत्यू देखील होऊ शकतो.
उन्हाळ्यात बाहेरून आल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि मज्जासंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
उन्हाळ्यात बाहेरून आल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने नसा आकुंचन पावू शकतात, ज्यामुळे डोकेदुखी किंवा मायग्रेन होऊ शकते.
याशिवाय, यामुळे गॅस, अपचन आणि पोटदुखीसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
तसेच, यामुळे ब्लड सर्क्युलेशनवर देखील परिणाम होतो.