Overtaking Tips: ओव्हरटेक करताना 'या' चूका जीवावर बेतू शकतात, काळजी घ्या

Dhanshri Shintre

ब्लाइंड स्पॉट

ओव्हरटेक करण्यापूर्वी मिररमध्ये आणि मागे पाहून खात्री करा की वाहन दुसऱ्या वाहनाच्या ब्लाइंड स्पॉटमध्ये नाही.

सिंग्नल न देणे

ओव्हरटेक करण्याआधी इंडिकेटर देणे आवश्यक आहे, जेणेकरून इतर वाहनचालक सजग राहतील.

अपुरा वेग घेणे

ओव्हरटेक करताना वाहनाचा वेग अधिक असणे गरजेचे आहे, अन्यथा अपघात होण्याची शक्यता वाढते.

दोन्ही बाजू पाहणे

पुढे आणि मागे कोणतेही वाहन येत नाही ना, याची पूर्ण खात्री करूनच पुढे जा.

वळण किंवा पूल

अंध वळण, पूल, चढ किंवा उतार याठिकाणी ओव्हरटेक करणे अत्यंत धोकादायक ठरते.

हार्न द्यावा

दुसऱ्या वाहनचालकाला सतर्क करण्यासाठी हार्न द्यावा, विशेषतः ग्रामीण भागात काळजी घ्यावी.

घाई करू नका

पाठीमागून येणाऱ्या वाहनाचा दबाव असल्यास घाई करू नका, शांत राहून योग्य वेळेची वाट पाहा.

सुरक्षित अंतर

ओव्हरटेक करताना आणि ओव्हरटेक केल्यानंतर सुरक्षित अंतर राखणे गरजेचे आहे.

लेनमध्ये शिफ्ट व्हावे

ओव्हरटेक झाल्यावर योग्य अंतरावर आल्यानंतरच लेनमध्ये शिफ्ट व्हावे, अन्यथा धोकादायक ठरू शकते.

NEXT: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशनची भारतात धमाकेदार एंट्री, किंमत जास्त पण जबरदस्त फीचर्स

येथे क्लिक करा