Dhanshri Shintre
पोर्शेने भारतात त्यांच्या केयेन ब्लॅक एडिशन लक्झरी एसयूव्ही कारची नवीन आवृत्ती लाँच केली आहे.
पोर्शेच्या ब्लॅक एडिशन मॉडेलची बुकिंग आता देशभरातील अधिकृत डीलरशिपवर सुरू झाली आहे.
कंपनीने सांगितले की, ही कार यावर्षीच्या शेवटी ग्राहकांना डिलिव्हरी करण्यास सुरु करेल.
पोर्शे कारमध्ये हेडलाइट्स, साइड मिरर, विंडो फ्रेम आणि बॅजिंगवर ब्लॅक-आउट डिझाइनने कारचे आकर्षण वाढले आहे.
'ब्लॅक एडिशन' असूनही, ही कार पांढरा, सिल्वर, ग्रे, लाल आणि बेजसह अनेक आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
ग्राहक जर वेगळा रंग निवडू इच्छित असतील तर त्यासाठी ७.३० लाख रुपये आणि कस्टम रंगासाठी २०.१३ लाख रुपये अतिरिक्त भरावे लागतील.
पोर्शे केयेन ब्लॅक एडिशनची भारतातील किंमत सुमारे १.८० कोटी रुपये आहे, ज्यामुळे ही लक्झरी एसयूव्ही प्रीमियम सेगमेंटमध्ये येते.