Manasvi Choudhary
दिवाळी सुट्टीनिमित्त अनेकजण फिरायला जाण्याचे प्लान करतात. दिवाळीच्या सुट्टीत गोवा फिरण्यासाठी बेस्ट आहे.
गोव्यात शांत समुद्र आणि नारळाच्या बागा असं नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळतो. दिवाळीच्या सुट्टीमध्ये गोव्याला जाण्याचा प्लान करत असाल तर तुम्ही या ६ ठिकाणी भेट देऊ शकता.
दिवार बेट हे गोव्यातील प्रसिद्ध बेट आहे. मांडवी नंदीत वसलेले बेट नैसर्गिक सौंदर्य आणि प्रसन्न वातावरणासाठी ओळखले जाते.
बटरफ्लाय बीच ही गोव्यातील अनोखी जागा आहे. या बीचवर बटरफ्लाय असतात यामुळे या बीचला बटरफ्लाय असं नाव पडलं आहे.
कलंगुट हा गोव्यातील एक अत्यंत लोकप्रिय बीच आहे. जो उत्तर गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाते.
गोव्यात प्रसिद्ध हरवलेम धबधबा आहे.हरवलेम धबधब्याजवळ रुद्रेश्वर मंदिर आहे. येथे मंगलमय वातावरण अनुभवता येते.
स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगसाठी प्रसिद्ध असलेले तारकर्लीचा निसर्ग नक्की पाहा.