Manasvi Choudhary
रात्रीचा संतुलित आहार हा आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. केवळ भूक लागली म्हणून नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदा होतो.
शरीराची पचनसंस्था आणि उर्जेची पातळी सुरळीत राहण्यासाठी रात्रीचे जेवण करावे. तज्ज्ञांच्या मतानुसार, रात्रीचे जेवण हे उशिरा करणे हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.
रात्रीचे जेवण नेहमी झोपण्यापूर्वी किमान २ ते ३ तास आधी करावे. रात्री उशिरा जेवण केल्याने आरोग्यासाच्या समस्या उद्भवतात. वजन वाढू लागते.
रात्री उशिरा जेवल्याने मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका जास्त असतो. रात्री उशिरा जेवल्याने झोपेवर देखील परिणाम होतो.निद्रानाशाची समस्या उद्भवते.
रात्री वेळेवर न जेवल्याने झोपेचा देखील त्रास उद्भवतो व चिंता होऊ शकते. रात्रीचे जेवण नेहमी झोपण्यापूर्वी किमान २ ते ३ तास आधी खाल्ले पाहिजे.
रात्री जेवण लवकर व वेळेत केल्याने आरोग्याला फायदा होतो. वजन नियंत्रणात राहते. आरोग्याच्या समस्या कमी होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.