Dhaba Style Chicken Curry: ढाबा स्टाईल चिकन करी घरी बनवण्याची सोपी पद्धत

Manasvi Choudhary

ढाबा स्पेशल चिकन करी

ढाब्यावरचं चिकन करी खारण्याची मज्जाच काहीशी वेगळी असते. ढाबा स्टाईल चिकन करी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Dhaba Style Chicken Curry | Social Media

साहित्य

चिकन करी बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम चिकन, लसूण पेस्ट, लिंबाचा रस, मीठ, कश्मिरी लाल मिरची पावडर, गरम मसाला, काळी मिरी, दालचिनी, कांदा, आले, लसूण, टोमॅटो, दही, हळद, जिरा पावडर, मीठ हे साहित्य एकत्र करा.

Chicken | Social Media

चिकनचे तुकडे करा

चिकन करी बनवण्यासाठी एका भांड्यात चिकनचे बारीक तुकडे, आलं- लसूण पेस्ट, लिंबाचा रस, मीठ, लाल तिखट, गरम मसाला हे मिश्रण मिक्स करा.

Chicken | Social Media

मसाले तयार करा

यानंतर लवंग, काळी मिरी, दालचिनी तुकडा याचा बारीक कूट करा. गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये ठेचलेला मसाला आणि सुक्या लाल मिरच्या परतून घ्या.

Chicken | Social Media

कांदा परतून घ्या

यानंतर कांदा हलकासा परतून घ्या त्यात चिरलेला लसूण भाजून घ्या. मॅरिनेट केलेले चिकन मंद आचेवर शिजवून घ्या नंतर त्यात टोमॅटो मिक्स करा.

Chicken | Social Media

चवीनुसार मीठ घाला

संपूर्ण मिश्रणात धनेपूड, कश्मिरी मिरची आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

Chicken | Social Media

ढाबा स्टाईल चिकन करी तयार

आता भांड्यावर झाकण ठेवून चिकन चांगले शिजवून घ्या अशाप्रकारे ढाबा स्टाईल चिकन करी तयार होईल.

Chicken | Social Media

next: Paneer Butter Masala Recipe: ढाबा स्टाईल पनीर बटर मसाला घरी कसा बनवायचा? रेसिपी आहे अत्यंत सोपी

येथे क्लिक करा..