Manasvi Choudhary
पनीर खायला सर्वांनाच आवडते. पनीरच्या वेगवेगळ्या रेसिपी हॉटेलमध्ये मिळतात.
ढाब्यावर पनीर बटर मसाला अत्यंत टेस्टी रेसिपी आहे. पनीर बटर मसाला बनवण्यासाठी पनीर, कांदा, आले, लसूण, काजू, टोमॅटो, बटर, हळद आणि मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम एका कढईत बटरमध्ये आले आणि लसूण चांगले परतून घ्या. या मिश्रणात चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या
त्यात टोमॅटो आणि काजू पेस्ट मिक्स करा. मिश्रण एका भांड्यात थंड करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
कढईत बटर, वाटून घेतलेली पेस्ट, हळद, मसाला चांगले एकत्र परतून घ्या. आता या संपूर्ण मिश्रणात पाणी मिक्स करून भाजीला उकळी येऊ द्या.
चवीनुसार भाजीमध्ये मीठ घाला आणि चांगली शिजवून घ्या अशाप्रकारे गरमा गरम ढाबा स्टाईल पनीर बटर मसाला खाण्यासाठी तयार आहे.