Shraddha Thik
शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकांना अशक्तपणा जाणवतो, दम लागतो, थोडे सुद्धा काम केले की थकवा जाणवतो. यासाठी शरीरातील रक्त वाढवणे गरजेचे आहे.
मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा.
दररोज एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस प्यावा. सफरचंद, बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकल्यास लवकर रक्त वाढण्यास मदत होते.
चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करावे.
रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गूळ खावा.
टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात 'व्हिटॅमिन सी' असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते.
दोन चमचे तीळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. नंतर पाणी गाळून तिळाची पेस्ट करुन घ्या. यामध्ये मध मिसळून दिवसातुन दोन वेळेस हे मिश्रण खावे. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.