Panvel Tourism: स्वर्गापेक्षाही सुंदर आहेत पनवेलमधील हे Hidden Spots; न्यू ईअरचा प्लान बनेल परफेक्ट

Surabhi Jayashree Jagdish

पनवेल

आज आपण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक असलेल्या पनवेलबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुम्ही पनवेलला जाण्याचा प्लॅन करत असाल तर या पाच ठिकाणांना आपल्या यादीत नक्की समाविष्ट करा.

प्रबळगड किल्ला

पनवेलमध्ये फिरण्याचा प्लान करत असाल तर तुम्ही प्रबळगड किल्ला पाहू शकता. हा किल्ला ऐतिहासिक महत्त्वाचा असून निसर्गरम्य वातावरणात वसलेला आहे. त्यामुळे पर्यटकांना याठिकाणी भेट देणं आवडतं.

कर्नाळा किल्ला

कर्नाळा किल्ल्याला फनल किल्ला असंही म्हटलं जातं. हा किल्ला पनवेलपासून फक्त १० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या ठिकाणी पोहोचणं फार सोपं आहे.

अदाई धबधबा

अदाई धबधबा हा पनवेलमधील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे. याठिकाणी निसर्गाचा तुम्हाला अनुभव घेता येतो. हा धबधबा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे.

कर्नाळा पक्षी अभयारण्य

पनवेलच्या जवळच कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. याठिकाणी विविध प्रकारचे जीव आणि सुंदर दृश्यं पाहायला मिळतात. पक्षीप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गासमान मानलं जातं.

बल्लाळेश्वर मंदिर

बल्लाळेश्वर मंदिर भगवान गणेशाला समर्पित करण्यात आलेलं आहे. हे मंदिर पनवेलमध्येच असून धार्मिक श्रद्धा आणि सौंदर्यामुळे हे मंदिर प्रसिद्ध आहे.

अविस्मरणीय अनुभव

पनवेलमध्ये अनेक ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक ठिकाणं आहेत. ही ठिकाणं पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देतात.

Spicy curry chutney: जेवताना तोंडी लावायला काहीतरी हवंय? मग १० मिनिटात बनवा ही झणझणीत कडीपत्त्याची चटणी

येथे क्लिक करा